Jayant Patil | मुख्यमंत्र्यांच्या हुकूमशाहीला महाराष्ट्रात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील
Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेला विरोधकांकडून जोरदार विरोध होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या मोहिमेसाठी जळगावला जाणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही, असं जयंत पाटील ट्विट करत म्हणाले आहे.
ट्विट करत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “शासन आपल्या दारी या मोहिमेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात असणार आहेत. या कार्यक्रमासाठी अधिकाधिक गर्दी जमवावी या हेतूने शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. रेशनकार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे रेशन कार्ड रद्द करून पुढील चार महिने धान्य पुरवले जाणार नाही असा धमकी वजा संदेश पसरवण्यात येत आहे.”
Maharashtra has never seen such a dictatorship – Jayant Patil
“मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे? महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असही त्यांनी (Jayant Patil) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'शासन आपल्या दारी' या मोहिमेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात असणार आहेत. या कार्यक्रमासाठी अधिकाधिक गर्दी जमवावी या हेतूने शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. रेशनकार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे रेशन कार्ड रद्द करून पुढील चार महिने धान्य… pic.twitter.com/w9LSV5x3GI
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 27, 2023
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेसाठी जळगावला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाला अनुपस्थितीत राहिल्यास रेशन मिळणार नाही, असं वृत्त एका वृत्तपत्रात छापून आलं आहे. त्यावरून जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हे ट्विट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ODI World Cup | वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या सविस्तर
- Ambadas Danve | खत, बियाणे डबलचा भाव, शेतकऱ्यांना मदत अर्धीच करता राव; अंबादास दानवेंचं सरकारवर टीकास्त्र
- Sanjay Raut | बाळासाहेबांच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरून आले – संजय राऊत
- Thackeray Group | आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होईल; शिवसेना नेत्याचा दावा
- Pune Crime | पुणेकरांनो सावधान! पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3JuVC8M
Comments are closed.