Jayant Patil | विरोधी पक्षनेता कोणाचा होणार? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या काही आमदारांसह भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता विरोधीपक्ष नेता कोणत्या पक्षाचा असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

There is a possibility of becoming the leader of the opposition party of Congress – Jayant Patil

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “संख्याबळाचा जर विचार केला तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होण्याची शक्यता आहे, असं मला वाटतं. कारण संख्याबळ आता स्पष्ट होत चाललं आहे. त्यानुसार विधिमंडळात काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष असेल.”

पुढे बोलताना ते (Jayant Patil) म्हणाले, “सरकारचं राज्यकारभाराकडे अजिबात लक्ष नाही. त्यांनी लवकरात लवकर खातीवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार करायला हवा. भाजपनं नवीन नेते सोबत घेतले आहे. मात्र, अद्याप त्यांना मंत्री पद मिळालेलं नाही.”

“सध्या सरकारमध्ये मंत्र्यांचा शपथविधी झालेला असला तरी खाते वाटप झालेले नाही. ही चिंताजनक बाब आहे. कारण येत्या अधिवेशनामध्ये विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी नव्या मंत्र्यांना अभ्यासाची गरज लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंगात असलेल्या आरोपींना फोन जातात, संजय राऊत यांनी केलेला हा दावा जर खरा असेल तर ही एक अत्यंत गंभीर बाब आहे”, असही ते (Jayant Patil) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NR4nLG