Jayant Patil | संभाजी भिडेंच्या ‘त्या’ विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Jayant Patil | मुंबई : शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी एक विधान केलं आहे. एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,’ असं म्हणत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिला पत्रकाराला बोलण्यास नकार दिला. यावरून राजकीय वर्तुळात त्याविषयी चर्चा केल्या जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोहर भिडे यांचे उद्गार महिलांचा अपमान करणारे आहे. त्याला भारतमातेची पुष्टी जोडणं हे अनाकलनीय आहे. महाराष्ट्रातील सर्व महिला त्याचा निषेध करतील. अशी प्रवृत्ती सत्तारुढ पक्ष जोपासते आहे. हो महाराष्ट्राच्या महिलांनी नोंद घेणं आवश्यक आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

यापुर्वी देखील राष्ट्रवादी पक्षाच्या सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक आकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी हेरंब कुलकर्णी यांची कविता लिहिली आहे.

तू आणि मी ….?
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली
मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू
तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ
तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा
मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल
तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो
मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का…!!!
मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास …..!!!!!
-हेरंब कुलकर्णी

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.