Jayant Patil । ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने भष्ट्राचाराचे खोटे आरोप केले; जयंत पाटलांचा दावा
मुंबई : ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्या राजीनाम्यावरुन चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. हा राजीनामा महापालिका मंजूर करत नसल्याने हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. या प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा मिळाला असून त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यानंतर त्यांनी निवडणूक अर्ज भरला. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील हे ऋतुजा लटके यांच्या अंधेरी पोटनिवडणुकीवर म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येईल. अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यासाठी भष्ट्राचाराचे भाजपाकडून खोटे आरोप करण्यात आलेत. एका महिलेच्या विरोधात किती कारवाया, किती कृत्य हे भाजप शिंदे सरकार करते. हे अंधेरीची जनता मान्य करणार नाही. जेवढा विरोध लटके यांचा हे करतील ते तेवढा मोठा पराभव या भाजप आणि शिंदे गटाचा होईल, असा आरोप जयंत पाटील यांनी लावला.
यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. पाटील म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण हिसकावून घेतलं. महाराष्ट्राच्या जनतेला हे पसंत पडलेलं नाही, असं जयंत पाटील म्हणालेत. शिंदेंनी जरी धनुष्यबाणावर दावा केला. चिन्ह गोठवण्यात आलं. तरी उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळालं आणि ते लोकप्रिय झालं, असं ते म्हणाले.
आता शिंदेंनी पुढचं पाऊल टाकलं. मशाल बदलण्याचा प्रयत्न केला. तरी पुढे मिळणारं जे चिन्ह असेल तेही तितकंच लोकप्रिय होईल, असं जयंत पाटील म्हणालेत.उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला महाराष्ट्रात महत्त्व आहे. चिन्हापेक्षा लोकभावनेला जास्त महत्त्व आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. जे आमदार उद्धव ठाकरे यांची फसवणूक करून जे आमदार गेले आहेत. त्यांच्याविरोधात जनमत महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात सर्व महाराष्ट्रातील जनता आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे पसंत पडलेलं नाही, असं पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Kirit somaiya | राजकीय नेत्यांनी अर्धवट ज्ञानाच्या आधारावर…”; मुलाच्या ‘पीएचडी’वर टीका करणाऱ्यांना किरीट सोमय्यांनी सुनावलं
- Health Care Tips | ‘या’ आयुर्वेदिक औषधी वापरून डायबिटीज वर ठेवता येऊ शकते नियंत्रण
- Viral Video | मिश्किलपणे खाऊ खाताना दिसली ‘ही’ खारुताई, पाहा व्हिडिओ
- Asaduddin Owaisi | हिजाब नाही मग बिकिनी घालायची का?; हिजाबवाली महिला PM म्हणून बघायचीय…
- Jayant Patil । “ठाकरेंकडून सत्ता-धनुष्यबाण हिसकावून घेतलं, महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही, उत्तर मिळणारच!”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.