Jayant Patil । “ठाकरेंकडून सत्ता-धनुष्यबाण हिसकावून घेतलं, महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही, उत्तर मिळणारच!”
जळगाव । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड करत ४० आमदार सोबत घेत बाहेर पडले. यानंतर पुढे त्यांनी भाजप सोबत राज्यात युतीचं सरकार स्थापन केलं. तसेच शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. यानंतर यांच्यातील वाद एवढा वाढला कि तो सुप्रीम कोर्टात गेला. यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय देणायचे अधिकार निवडणूक आयोगाला दिले. मात्र निवडणूक आयोगाने पक्षाचं अधिकृत चिन्ह गोठवलं. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. पाटील म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण हिसकावून घेतलं. महाराष्ट्राच्या जनतेला हे पसंत पडलेलं नाही, असं जयंत पाटील म्हणालेत. शिंदेंनी जरी धनुष्यबाणावर दावा केला. चिन्ह गोठवण्यात आलं. तरी उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळालं आणि ते लोकप्रिय झालं, असं ते म्हणाले.
आता शिंदेंनी पुढचं पाऊल टाकलं. मशाल बदलण्याचा प्रयत्न केला. तरी पुढे मिळणारं जे चिन्ह असेल तेही तितकंच लोकप्रिय होईल, असं जयंत पाटील म्हणालेत.उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला महाराष्ट्रात महत्त्व आहे. चिन्हापेक्षा लोकभावनेला जास्त महत्त्व आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. जे आमदार उद्धव ठाकरे यांची फसवणूक करून जे आमदार गेले आहेत. त्यांच्याविरोधात जनमत महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात सर्व महाराष्ट्रातील जनता आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे पसंत पडलेलं नाही, असं पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Nitesh Rane । “उद्धव ठाकरेंना मशाल नाही, आईस्क्रीमचा कोन दिलाय”; नितेश राणे यांचा हल्लाबोल
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरे यांची मशाल काँग्रेसच्या हाती – चंद्रशेखर बावनकुळे
- Dilip Lande । मुरजी काका 100% निवडून येणार; दिलीप लांडे यांचा मोठा दावा
- Maharashtra Rain Update | राज्यात पुणे शहरासह ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
- Sachin Sawant । “नकला आणि कलाविष्कारमधील फरक…”; काँग्रेसने ट्विट केला मोदींचा ‘तो’ व्हिडीओ
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.