Jayant Patil । “भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण”; भाजपच्या माघारीनंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

Jayant Patil |  मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय निश्चित मानला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यासंदर्भात माहिती दिली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील असं त्यांनी सांगितलं. मुरजी पटेल अपक्ष म्हणूनही लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्यात गेले काही दिवस राजकीय नाट्य सुरू होते. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने न्यायालयात जाणे, त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करणे, हे अत्यंत क्लेशदायक असल्याचं जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणालेत. अंधेरी पोटनिवडणुकीसाठीच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवण्यात आलं. शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपाला उशीरा सुचलेले शहाणपण आहे. अन्यथा भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असते,” असं म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला टोला लगावला आहे.

ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात उमेदवार देऊ नका, हे आपल्या संस्कृतीशी सुसंगत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपला उमेदवार न देण्याची भावनिक साद घातली होती. यावर चर्चा करून निर्णय देऊ असं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं होत. यानंतर सकाळीही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात नेत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.