Jayant Patil |“माझ्यापुढं कोणी असा…”; फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Jayant Patil | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी एका कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. ‘महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करुन जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दिलं होतं’, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपानंतर विरोधकांनी प्रत्यारोप करायला सुरवात केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“माझ्यापुढं अशी कोणतीही चर्चा झाली नाही. याबाबत माजी गृहमंत्र्यांना विचारलं पाहिजे. मला वाटतही नाही आणि याची माहिती सुद्धा नाही. विरोधी पक्षनेत्याला अटक करणे म्हणजे लोकशाहीच्या विरुद्ध गोष्ट आहे. पण, अर्थसंकल्प कसा वाचायचा हे जाणून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस माझ्या घरी आले होते. आमचे संबंध द्वेषाचे नाहीत. माझ्यासमोर तर असे आदेश कोणी दिले नाही,” असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

“1990 पासून आम्ही सभागृहात आहोत. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस भाषण सभागृहात भाषण केल्यानंतर मंत्री असल्याने कार्यालयात येऊन चहा घ्यायचे. व्यक्तीगत द्वेष, सूड कधीच नव्हता. मात्र, अलीकडच्या काळात भाषा खालच्या स्तरावर गेली आहे. शेलक्या शब्दांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उपमर्द करण्याच्या प्रथा वाढलेल्या आहेत. कमी प्रतिमेची लोकं फार पुढं आली की असं होतं,” असे जयंत पाटलांनी सांगितले.  सध्या राजकीय नेत्यांची टीका करताची भाषा अतिशय खालच्या पातळीची असते. यावरुन जयंत पाटलांनी मत व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या :