अहमदनगरच्या जागेचा तिढा सुटेना, जयंत पाटील यांनी केले खंडन

लोकसभेसाठी अहमदनगरची जागा काँग्रेससाठीच असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी अकलूजमध्ये स्पष्ट केले होते. मात्र आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी ट्विट करत या विधानाचे खंडन केले आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही प्रसारमाध्यमांनी अहमदनगरची जागा पक्षाने काँग्रेस पक्षासाठी सोडली असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. असा कोणताही निर्णय झालेला नसून याबद्दलच्या बातम्या तथ्यहीन आहेत.

याआधी नगरची जागा मिळत नसल्याने विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांचा मुलगा सुजय विखे – पाटलांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीने अहमद नगरची जागा सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता काँग्रेस औरंगाबादची जागा राष्ट्रवादी साठी सोडण्याची शक्यता होती. मात्र जंयत पाटील यांच्या ट्विटनंतर आता पुन्हा एकदा अहमदनगरच्या जागेचा तिढा निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.