रासप कार्यकर्त्यांचा आघाडीला पाठिंबा, जयंत पाटील यांचा मोठा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी खळबळजनक दावा केला आहे. महायुतीतील नाराज असलेल्या महादेव जानकर यांच्या रासपचे कार्यकर्ते आघाडीला मदत करत आहेत, असा दावा जयंत पाटील  यांनी केला. सांगलीमध्ये जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपाकडून मंत्री महादेव जानकर यांना चुकीची वागणूक दिली, म्हणून रासपा कार्यकर्त्यांनी आमच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील म्हणाले, “महादेव जानकरांना भाजपने जी वागणूक दिली, ती अपमानजनक आहे. रासपच्या उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म देऊन त्यांना भरायला लावले. त्यावरुन त्यांची मित्रपक्षांशी वागणूक कशी आहे हे दिसून येतं. भाजपला रासपने पाठिंबा दिला तो धनगर आरक्षणासाठी. मात्र ते आरक्षणही मिळालं नाही. मात्र रासपलाही हाकलून लावण्याचं षडयंत्र हे भाजपने केलं. म्हणून रासपचे सर्व कार्यकर्ते जागोजागी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतोय. रासपच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही भविष्यात पूर्ण ताकदीने मदत करु”.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.