शिंदेंच्या पराभवावर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य म्हणाले,…

मुंबई : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटीतून आमदार शशीकांत शिंदे यांचा एका मताने नवखा उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी पराभव केला. या पराभवाची कारणमिमांसा करताना आमदार शिंदे यांनी निवडणुकीत आपण गाफिल राहिल्याचे कबुल केले. शशिकांत शिंदे यांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी पराभवाचा धक्का दिल्याचं सध्या साताऱ्यात बोललं जात आहे.
निवडणुकीत झालेल्या पराभवावरून शिंदे चांगलेच नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभर टक्के राजकारण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शशिकांत शिंदे यांनी केलेल्या आरोपाबाबत जयंत पाटील यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला. शशिकांत शिंदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. मी शिंदेंना भेटल्यानंतरच त्याबद्दल अधिक बोलू शकेन. नेमके त्यांचे मत काय आहे ते जाणून घेईन. त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. कोणासोबत आघाडी करायची हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. काँग्रेसने एक भूमिका घेतली असली तरी इतर पक्ष आघाडीबाबत भूमिका घेतील, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, नाना पटोलेंनी स्वतः दिली गुडन्यूज
- “वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”
- शिवेंद्रराजेंनीच मला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
- मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; अनिल परब यांची घोषणा
- “मी डंके की चोटपर सांगतोय, शरद पवारांनी विश्वासघात केला”