‘जयरगम फ्रिंजेस थिएटर फेस्टिव्हल’चे मुंबईत प्रथमच आयोजन

मुंबईत प्रथमच आयोजित होणाऱ्या ‘जयरंगम फ्रिंजेस नाट्यमहोत्सवा’च्या निमित्ताने देशाची ही आर्थिक राजधानी उजळण्यास सज्ज झाली आहे. ‘३ एम डॉट्स बँड्स’ यांच्यातर्फे भारत सरकारच्या कला व सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने आणि ‘मुक्ती फाउंडेशन’च्या सहकार्याने ‘मुक्ती कल्चरल क्लब’ येथे १५-१७ डिसेंबर २०१९ दरम्यान या तीन दिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.पारंपरिक मूल्ये, परफॉर्मिंग आर्ट्सबद्दल अभिरूची ही मुंबईची ओळख आहे. म्हणूनच मुंबईत  प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आहेत आणि या महोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारची लोकनाट्ये, राष्ट्रीय पातळीवरीआणि थरारक नाटकांचा अनुभव घेण्याची संधी प्रेक्षक निश्चितच साधतील.

जयरंगम फ्रिंजेस या महोत्सवाचे संचालक दीपक गेरा म्हणतात, “कला आणि नाटकाच्या जादूमध्ये प्रेक्षकांमध्ये किंवा व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे आयुष्यात बदल घडवून आणणारा साक्षात्काराचे क्षण या निमित्ताने अनुभवता येतात, त्यांचे मन, विचार अधिक खुले होते. जयपूर आणि राजस्थानमधील नाट्यप्रकारांचे वैविध्य साजरे करणे आणि त्यांना चालना देणेय या उद्दिष्टाने जयरंगम सुरू करण्यात आला. या पूर्वीच्या ७ पर्वांना प्रचंड यश लाभले आणि ८ व्या पर्वाच्या निमित्ताने या महोत्सवाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जयरंगमने जयपूरचे स्वप्न विणले आहे.

आता जयरंगमला महाराष्ट्र, कोलकाता आणि कर्नाटक येथेही असेच स्वप्न विणायचे आहे.”
या महोत्सवामध्ये ६ अभिजात नाटके सादर होणार आहेत. यात ‘द वे आय सी इट’ (शिव सुब्रमण्यम), ‘पिताजी प्लीज’ (मकरंद देशपांडे), ‘किस ऑफ अ स्पायडर वूमन’ (हार्दिक शाह), ‘बांसवाडा कंपनी’ (निरेश कुमार), ‘हम गुनहगार औरते’ (सादिया सिद्दीकी) आणि ‘बालीगंज १९९०’ (आतुल सत्या कौशिक) या नाटकांचा समावेश आहे. जयरंगम थिएटर फेस्टिव्हलसाठी प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे, दिव्या जगदाळे, राकेश बेदी, उद्धव ओझा, पावनी पांडे, सादिया सिद्दीकी हे कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.