Jaykumar Gore Accident | जयकुमार गोरेंचे वडील भगवान गोरे यांच्याकडून शंका व्यक्त, घातपाताची शक्यता

Jaykumar Gore Accident | पुणे : आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातदावर वडील भगवान गोरे यांनी शंका उपस्थित केली आहे. मला घातपाताची शक्यता वाटते असे भगवान गोरे यांनी म्हटले आहे. मात्र कुणावर संशय घेऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भगवान गोरे म्हणाले, अपघात होण्यासारखी जागा नाही, कठडा तोडून गाडी कशी जाते. हे फलटनमध्ये घडते आहे. त्यामुळे मला थोडी शंका आहे.

भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा फलटण तालुक्यातील मलटण गावच्या हद्दीत 50 फूट खोलदरीत गाडी कोसळल्याने अपघात झाला आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चौघेजण गंभीर जखमी झाले. उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले आहे. तात्काळ पोलीस मदत मिळाल्याने जयकुमार गोरे यांच्या सह त्यांचे अंग रक्षक,स्वीय सहाय्यक आणि चालक या चौघांना ही उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे.

हा अपघात कसा झाला याचा तपास सातारा पोलीस करत असून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. आमदार जयकुमार गोरे हे फलटणहून माणच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.