InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रिलायन्स ‘जिओ’ ची नवी ऑफर

रिलायन्सने ‘जिओ प्राईम मेंबरशिप’ ही नवी योजना त्यांनी लाँच केली आहे. यानुसार 1 ते 31 मार्चदरम्यान जिओची मेंबरशिप घेता येईल. सध्या जिओ वापरत असलेल्या किंवा 31 मार्चपर्यंत जिओ सिम घेतील अशा ग्राहकांना 99 रुपयांत प्राईम मेंबरशिप घेता येईल. या ऑफरनुसार जिओची मोफत 4G डेटा सेवा आणखी 1 वर्षासाठी मिळेल.
जिओचे नवे दर आणि मेंबरशिपचे इतर फायदे लवकरच जिओ अॅपवर जाहीर केले जातील. मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप 1 वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल, असे अंबानींनी सांगितले. मेंबरशिप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे.
प्राईम मेंबरशिप जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवरुन मिळवता येईल. शिवाय जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे 2017 च्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात जिओ नेटवर्क असणार आहे. 2017 अखेरपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात जिओ नेटवर्क उपलब्ध असेल, अशी घोषणा अंबानींनी केली. तसेच त्यांनी दावा केला आहे की 4G मोबाईल धारकांपैकी 99 टक्के युझर्सकडे जिओ असणार आहे.
एका दिवसात जिओ युझर्स व्हॉईस कॉलिंगचा वापर 200 कोटी मिनिट एवढा करतात. तर जानेवारीमध्ये एकूण 100 कोटी GB डेटा वापरण्यात आला असून प्रतिदिन 3.3 कोटी GB डेटा वापरण्यात येतो, असे अंबानींनी सांगितले. जिओने अवघ्या 170 दिवसांमध्ये 10 कोटी ग्राहक जोडले असून हा एक विक्रम मानला जात आहे.

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.