Jitendra Awhad | “काहीही झालं तरी ‘त्या’ वक्तव्यावरून माघार नाही”; जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम
Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली. आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली. त्यांचे प्रतिक्रात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. आव्हाडांच्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटलेले असतानाही आता जितेंद्र आव्हाडांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. त्यावरुन आता पुन्हा राज्यात संतापाची लाट उसळण्याची दाट शक्यता आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्यावरून माघार नाही”
“काहीही झालं तरीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून माघार घेणार नाही. मी काहीही चुकीचं बोललो नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे” असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून यानंतर आंदोलन केली गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्युत्तर म्हणून आंदोलन केली आहेत.
“मी जे बोललो ते 2 हजार टक्के वादग्रस्त बोललो नाही. अफझलखान 1 लाखाचं सैन्य घेऊन प्रतापगडाकडे निघाला होता. जिजाऊंनी महाराजांना सांगितलं माळरानावर अफझल खानाशी दोन हात करू नकोस. त्यानंतर विचार करून छत्रपती शिवरायांनी अफझल खानाच्या वकिलाला निरोप पाठवून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत अशी परिस्थिती निर्माण करून 5 जणांना हाताशी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला. अफझल खान एवढा मोठा सरदार होता. आदिलशाहीतला त्याला धारातिर्थी पाडण्याचा पराक्रम शिवरायांनी केला. त्यामुळे ते अफझल खानापेक्षाही मोठे झाले”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
“मी काहीही चुकीचं बोललो नाही”
“शाहिस्तेखान लाल महालात होता पण त्याला कळलं नाही शिवाजी महाराज कधी लाल महालात शिरले आणि बोटं छाटून गेले. औरंगजेब इतकी वर्षे दिल्लीत होता. महाराष्ट्रातली एक इंच जमीन त्याला घेता आली नाही. त्यामुळे महाराज श्रेष्ठ ठरले हेच तर मी बोललो. मी काहीही चुकीचं बोललो नाही”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
“माझी भूमिका ही सामाजिक, पक्षाची असेलच असं नाही”
“तुम्ही अंदमान वीर सावरकरांच्या जीवनातून काढून टाका मला सावरकर समजवून सांगा, नथुरामच्या आयुष्यातून महात्मा गांधी काढून टाका आणि मला नथुराम समजावून सांगा. हिटलर, मुसोलिनी काढून टाका मला दुसरं महायुद्ध समजावून सांगा. माझी भूमिका ही मी सामाजिक भूमिका घेतली आहे. त्याचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडू नका. माझी काही सामाजिक भूमिका असेल तर ती पक्षाची असेलच असं नाही. पक्षाच्या ऐतिहासिक भूमिकेत मतमतांतरं असू शकतात” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
विनोद तावडेंचं प्रत्युत्तर (Vinod Tawade Replied to Jitendra Awhad)
“मी शिक्षण मंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, असं जितेंद्र आव्हाड एका भाषणात म्हणाले. मी सांगू इच्छितो की, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ छत्रपतींचा शौर्याचा इतिहास काढणार असे होत नाही. मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ, आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांची भलामन करणारा इतिहास बाजूला काढणार. मोगलांनी कलेला आश्रय दिला, त्यांचे स्थापत्यशास्त्र चांगलं होतं, हा इतिहास काढणार. ‘अकबर द ग्रेट’ ज्याने लाखो हिंदूची कत्तल केली, याची शिकवण बाजूला काढणार”, असे विनोद तावडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Vinod Tawde | “जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक…”; आव्हाडांच्या वक्तव्यावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया
- Jitendra Awhad | “मी जे बोललो त्याचे संदर्भासहित…”; छत्रपती शिवरायांबाबत वक्तव्यानंतर आव्हाडांचं आणखी एक ट्वीट
- Shailesh Tilak | “हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती”; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत
- Aaditya Thackeray | “लढायची हिंमत नाही हे सरळ सांगितलं असतं तरी…”; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं
- Chandrashekhar Bawankule | “आणखी वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”; बावनकुळेंचं विरोधकांना पुन्हा आवाहन
Comments are closed.