Jitendra Awhad | “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी काहीही चुकीचं बोललो नाही” – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधकांकडून त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर आव्हाडांविरोधात अनेक आंदोलन करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जितेंद्र आव्हाडांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. त्यावरून राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी काहीही चुकीचं बोललो नाही”

मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही चुकीचं बोललो नाही, असं ठाम मत जितेंद्र आव्हाड यांनी मांडलं आहे. ट्विट करत आव्हाड म्हणाले, “रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज कुठे असते …
हे कोण बोलले …,
आणि ह्यावर कोण कोण तुटून पडले …
मी काही ही चुकीचे बोललो नाही…
महाराजांचे स्वकरतुत्व झाकून ठेवायची ह्यांची जुनी सवय आहे…”

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी राजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजी राजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संभाजी छत्रपतींचं ट्वीट (Sambhaji Chhatrapati’s Tweet)

जितेंद्र आव्हाडांना त्यांच्या या वक्तव्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संभाजी राजे यांनी ट्विट करत दिला आहे. “जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील”, असे संभाजी राजे ट्विट करत म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड नक्की काय म्हणाले होते? (Jitendra Ahwad’s Controversial Statement)

“एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे ना. 1669 साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या