Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचं राहुल नार्वेकरांवर टीकास्त्र ; म्हणाले …

Jitendra Awhad | मुंबई : सध्या सर्वांचं लक्ष 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाकडे लागलं आहे. याबाबत राजकीय वर्तुळात टीका- टिप्पणी देखील सुरू आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी याबाबत वेगवेगळे मुद्धे देखील उपस्थित केले आहे. याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली. तर आता यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ( What Jitendra Awhad said)

जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यवर सडकून टीका केली. आव्हाड म्हणाले की, राहुल नार्वेकर हे जबाबदारीच्या पदावर बसले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली. नार्वेकर ज्या पदावर बसून निर्णय देणार आहेत, त्यांचं ते बोलणं आणि सर्वोच्च न्यायायलयाचा निकाल या दोन्ही गोष्टीत विरोधाभास आहेत. तसचं 2023 चा राजकीय पक्ष ते 2022 ला आणणार असतील तर ते हास्यासपद आहे. जे कोर्टानं म्हटलं आहे ते स्पष्ट मांडल आहे. यामुळे त्यांना बोलायला चान्स नाही. यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरची टीका- टिप्पनी करणं म्हणजे तुम्ही पक्षपाती करण्यासारखं आहे. यामुळे जे काही अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे त्यानुसार नि:पक्षपातीपणे निर्णय द्यावा लागेल. असं आव्हाड म्हणाले.

दरम्यान, जे काही कोर्टाने रुल बुक दिल आहे त्याच्या बाहेर कसं काय नार्वेकर यांच्यासारखा हुशार, सुप्रसिद्ध वकील जाऊ शकतो आणि कोर्टाच्या निकालावरती कशी काय टीका करू शकतात? असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तसचं जे काही नार्वेकर बोलतात की, मला हवा तेवढा वेळ मी घेईल कारण कोर्टाने मला तीन महिने दिले आहे. हे सगळं त्याचा राग आहे म्हणून बोलतात, यातून त्यांचा राग दिसतोय. असं देखील आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-