Jitendra Awhad | “ज्या माणसाने दारू पिऊन…”; जितेंद्र आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार हल्लाबोल 

Jitendra Awhad | मुंबई : ठाण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने केला होता. यामागे पूर्वनियोजित कट असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात रान उठवले होते. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले आहे. स्वत:ची बायको सोबत ठेवली की विनयभंगाच्या तक्रारी होत नाहीत, असे सदावर्ते यांनी म्हटले.

त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते यांनी अलीकडेच मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानानंतर आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेच्या वेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली आहे. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा करणं, हा संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांचा अपमान असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. “मुंबईसाठी अनेकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं इतकं सोपं नाही. संयुक्त महाराष्ट्र कसा निर्माण झाला, याचा देदीप्यमान इतिहास आहे. तो इतिहास लोकं कसा विसरतील?”, असा सवालही त्यांनी केलाय.

पुढे ते म्हणाले, “अशा वायफळ बडबड करणाऱ्या व्यक्तीवर जास्त बोलायला आवडत नाही. ज्या माणसाने दारू पिऊन शरद पवारांच्या घरात घुसखोरी करण्यासाठी पोरं पाठवली. त्यांच्याबद्दल मी काय बोलू? तो माणूस माझ्या दृष्टीने बोलण्याच्याही उंचीचा नाहीये.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.