Jitendra Awhad | “नशीब राज्यपालांनी लवकर माफी मागितली…” ; जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

मुंबई : रक्ताचे पाट वाहून ही भूमी आम्ही मिळविली आहे. 105 हुतात्मे देऊन आम्ही मुंबई मिळविली आहे. मराठी माणसाचे मन मोठे आहे, कोश्यारी तुम्हाला मराठी माणूस माफ करेल. कारण याच मनाने गुजरात्यांना स्वीकारले आहे. स्वतःचा घाम गाळून त्यांचे खिशे भरले. पण, त्याबद्दल आम्ही कधीच आसूया बाळगली नाही. आमची मनं मोठी आहेत.

मला वाटते की हा मराठी माणसाचा विजय आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने आज राजभवनावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मराठी माणसाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टीकेबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली. याबाबत ते पत्रकारांशी बोलता होते.

महत्वाच्या बातम्या :

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.