Jitendra Awhad | नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका ; म्हणाले…

Jitendra Awhad | मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) 19 मे ला घेतलेल्या दोन हजारांच्या नोटाबंदी बाबतच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात टीका- टिप्पणी सुरू आहेत. विरोधकांकडून देखील याबाबत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत नोटबंदीवरून केंद्र सरकारवर (Central Government) टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटलं आहे की, “टॅक्स आणि चलनी नोटांचे प्रयोग यथेच्छ झाले आहेत साहेबांनी दिल्लीतली राजधानी दौलताबादला हलवून टाकावी म्हणजे इतिहासाची पूर्णपणे पुनरावृत्ती होईल”, अशा शब्दांत टीकास्त्र सोडत जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ट्वीट केलं आहे.

Jitendra Awhad Commented On Narendra Modi

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात येईल असा निर्णय जाहीर केला. तसचं २ हजारच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक बँकेतून बदलून घ्याव्यात असं देखील सांगण्यात आलं आहे. याचप्रमाणे RBI ने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, 2019 पासूनच 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. यामुळे आता नागरिकांना काळजीपूर्वक या सुचनाच पालन करून 2 हजारांच्या नोटा बदलाव्या लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3OxaBSW