Jitendra Awhad | “बोम्मईंचे कपडे सांभाळताना तुमचे कपडे…”; जितेंद्र आव्हाडांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

Jitendra Awhad | नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही.

सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये बसवराज बोम्मई यांनी आपले ट्विटर हँडल हॅक झाले होते असे सांगितले होते. त्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत राज्यातील सत्ताधाऱ्यांना देखील सुनावलं आहे. ‘बोम्मई हा खोटारडा माणूस असून ट्विट केल्यानंतरही जर ही गोष्ट त्यांना 15 दिवसांनी माहिती होत असेल तर मोठी आणि गंभीर गोष्ट आहे’, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “त्यांचे कपडे सांभाळायला आमचे मंत्री जात आहेत मात्र त्यांचे कपड सांभाळताना तुमचे कपडे उतरत आहेत.” कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटमुळे आमच्या राज्यातील माणसांची वाहनं फुटली, मराठी माणसांनी मार खाल्ला, त्यांचा अपमान झाला तरीही आम्ही शांत राहिलो आणि हा बोम्मई दिल्लीत येऊन खोटं सांगतो की, मी ट्विट केलं नाही. हा निव्वळ खोटारडे पणा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.