Jitendra Awhad | “मी कोर्टात गेलो तर…”, जितेंद्र आव्हाड पडले मोठ्या संकटात; नवीन ट्विट पुन्हा चर्चेत

Jitendra Awhad | मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्यावर गेल्या आठवड्यात हर हर महादेव चित्रपटावरुन आक्रमक भूमीका झालेली पाहायला मिळाली होती. यावेळी त्यांच्यावर ७२ तासांमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर, त्यांनी ट्विट करत राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. अशातच आता राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचं आणखीन एक नवीन ट्विट चर्चेत आलं असून यामध्ये आव्हाडांसमोर मोठं प्रश्न चिन्ह उपस्थित झाल्याचं दिसून येत आहे.

शेअर केलेल्या ट्विटमध्ये, माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले. उया गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

तसेच, म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हात वर करून मोकळे होऊन जातील. ह्याच्यात काय करावे हे सुचत नाहीये. आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवा, कि ह्या वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी अर्थात त्यांचा काय दोष आदेश कुठून आले हे महाराष्ट्र ला माहीत आहे, असं देखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1594947085677527041?s=20&t=OXEqJlfckJcpE4IjUsX7ygे

दरम्यान, संबंधित ट्विटनंतर जितेंद्र आव्हाड काय भूमीका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तसेच, आव्हाडांचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.