Jitendra Awhad | मी घरं बांधून दिली तशी तुम्ही देणार का? इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांचा राज्य शासनाला खडा सवाल
Jitendra Awhad | मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. या घटनेमध्ये अख्खी वस्ती मातीखाली दबली गेली आहे. या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
When I was in government, I built houses for accident victims – Jitendra Awhad
माध्यमांशी संवाद साधत असताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “मी सरकारमध्ये असताना दुर्घटनाग्रस्तांना घरी बांधून दिली होती.
तळीये येथे झालेल्या दुर्घटनेनंतर आम्ही लोकांना घरं बांधून दिली होती. पुढच्या पिढीला या घटनेमुळे वेदना होणार नाही याची काळजी आम्ही घेतली होती. इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर हे सरकार देखील नवीन घरे बांधून देईल.
पुढे बोलताना ते (Jitendra Awhad) म्हणाले, “मी गृहमंत्री असताना घर बांधून दिली होती. त्याचप्रकारे तुम्ही देखील देणार का?” जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिला आहे.
“तुम्ही मंत्री नाही म्हणून काम होणार नाही, असं काही नाही. आम्ही देखील व्यवस्थित घर बांधून देणार आहोत”, असं भरत गोगावले (Bharat Gogawle) यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काल (19 जुलै) रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली (Jitendra Awhad) आहे. गावातील लोक झोपलेले असताना त्यांच्यावर हे नैसर्गिक संकट कोसळलं आहे.
या घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांवर सरकारी खर्चानं उपचार केले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | जखमींवर सरकारी खर्चानं उपचार तर मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा
- Sharad Pawar | “माझी राज्य शासनाला विनंती आहे की…”; इर्शाळवाडी घटनेवर शरद पवारांची प्रतिक्रिया
- Devendra Fadnavis | इर्शाळवाडी घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…
- Eknath Shinde | रायगडच्या इर्शाळवाडीत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन होणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
- Nilesh Rane | फक्त फोन करून किंवा सूचना देऊन काही होत नाही; निलेश राणेंची अजित पवारांवर खोचक टीका
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43tizk1
Comments are closed.