Jitendra Awhad | “मी जे बोललो त्याचे संदर्भासहित…”; छत्रपती शिवरायांबाबत वक्तव्यानंतर आव्हाडांचं आणखी एक ट्वीट

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखानावर केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या वक्तव्याचा आक्षेप व्यक्त करत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली जात असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्वीटद्वारे त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करून तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही त्याला उत्तर देऊ”, असे जितेंद्र आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यासाठी त्यांनी पुण्यातील आपल्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच वक्तव्याचा कसा विपर्यास केल्याचे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

आव्हाडांचे नवे ट्वीट (Jitendra Ahwad’s New Twit)

“मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकासमोर मांडले. तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही उत्तर देऊ,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसेच बहुजन इतिहास डोळ्यात का सलतो? असा थेट सवालही आव्हाड यांनी केला असून ‘करारा जवाब मिलेगा’ असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य (Jitendra Awhad’s Controversial Statement)

जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात बोलताना एक वक्तव्य केले होते. याच विधानावर आक्षेप घेत विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे ना. 1669 साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.