Jitendra Awhad | “… म्हणून 50 खोके आमच्या डोक्यात बसले आहे”; गुलाबराव पाटलांना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

Jitendra Awhad | नागपूर: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाला 20 जुन रोजी एक वर्ष पूर्ण झालं. हा दिवस ठाकरे गटाकडून ‘गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या प्रकरणावरून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabarao Patil) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. ठाकरे गटाकडं खोके आणि गद्दार सोडून दुसरा मुद्दा नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Eknath Shinde’s rebellion is against the culture of Maharashtra – Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं बंड महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे तुमचे 50 खोके महाराष्ट्राच्या घराघरात आणि लोकांच्या डोक्यात गेले आहे. त्यामुळे लोकं गाढव, म्हैस, घोडे, बैल सगळ्यांवर 50 खोके लिहीत असतात. तुमच्या विरोधात लोकांच्या मनात किती राग आहे, याबाबत तुम्ही विचार करायला हवा.”

पुढे बोलताना ते (Jitendra Awhad) म्हणाले, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खाली आणण्यासाठी जे 40 आमदार गेले आहे, ते 40 आमदार अख्खा महाराष्ट्र लुटायला जरी निघाले, तरी त्यांना रोखणारं कोणी नाही.”

Gulabrao Patil reacted after Thackeray group celebrated Traitors Day

ठाकरे गटानं गद्दार दिन साजरा केल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. गुलाबराव पाटील म्हणाले, “ठाकरे गटाकडे गद्दर आणि खोके सोडून दुसरा मुद्दा नाही. जेव्हा नारायण राणे (Narayan Rane) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) पक्ष सोडून गेले, तेव्हाच आम्ही देखील गेलो असतो. कारण तेव्हा देखील आम्हाला ऑफर देण्यात आल्या होत्या.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/jitendra-awhad-reply-to-gulabrao-patal-on-the-50-khoke-issue/?feed_id=45509