Jitendra Awhad | शरद पवारांनी राजीनामा माघारी घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया ; म्हणाले …

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी काल ( 5 मे) अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा माघारी घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतं आहे. त्याआधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पण काल सकाळी निवड समितीच्या बैठक देखील पार पडली त्यामध्ये पवार साहेबांनी अध्यक्षपदावर कायम राहाव असं निवेदन करण्यात आलं त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा माघारी घेत असल्याचं सांगितलं. तर आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधकांना फटकारत पवारांच्या राजीनामा माघारीवर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड (What Jitendra Awhad said)

माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, आमच्या सेनापतीशिवाय ( शरद पवार) सैन्य लढू शकत नाही. फक्त सैन्य लढायला उतरलं होतं पण आमच्या सेनापतीने सांगितलं की, मी आता सेनापती नाही. सेनापती नसता तर युद्ध लढता आलं नसतं…पण आता आनंद आहे. आमचे सेनापती पुन्हा रणांगणात आले आहेत. त्यामुळे आता बघुया रणांगणात काय होतंय असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना इशाराही दिलाय.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वी जर शरद पवार राजीनामा माघारी घेणार नसतील तर मी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देतो असं म्हणत त्यांनी देखील पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा दिला. याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील समितीच्या बैठकीला आता जाण्यासाठी माध्यमांशी बोलताना म्हटलं होत की, आम्ही पवार साहेबांसमोर ठराव मांडणार आहोत. राजीनामा त्यांनी माघारी घ्यावा ही सर्वांनची ईच्या आहे. जर त्यांनी राजीनामा माघारी घेतला नाही तर आम्ही उपोषण करू. याचप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांनी देखील गेले 3ते4 दिवस मुंबईमध्ये आंदोलन छेडलं होता. यामुळे सर्वानाच्या भावनांचा आदर करत असल्याचं म्हणतं शरद पवारांनी राजीनामा माघारी घेतला .

महत्वाच्या बातम्या-

You might also like