Jitendra Awhad | हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग? जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला खडा सवाल

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: आज बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे.

Is this samruddhi of prosperity or highway of death..? – Jitendra Awhad

ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..? हा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून पासून आतापर्यंत अनेक अपघात झालेत. गेली वर्षभरात त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.

“समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा आणूनही अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे सामोरं आलेले आहे. यापुढे असे अपघात होऊ नये यासाठी सरकारने वेळीच उपाय-योजना करून योग्य ती पावले उचलावी”, असही ते (Jitendra Awhad) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर झालेला हा अपघात सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ झाला (Jitendra Awhad) आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामुळे बस पलटी झाली आणि बसला अचानक आग लागली. या अपघातामध्ये 25 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3poO2G6

You might also like

Comments are closed.