Jitendra Awhad | “हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीत नको”; राज्यपालांच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

Jitendra Awhad | मुंबई : मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केले. कोश्यारी यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत, शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वक्तव्य केलंय.

यामुळे आता एक नवी वाद सुरु झालाय. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“थोड्या दिवसांपूर्वी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की, हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीत नकोत. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत, अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झाले आता बोचकं गुंडाळ,” अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणालेत राज्यपाल?

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.” तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.