Jitendra Awhad | “रामायणातून रावण काढून मग श्रीराम समजून सांगा”; जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटने नवा वाद

Jitendra Awhad | मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोणा एकाकडून एखादं वादग्रस्त वक्तव्य केलं जातं. त्याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षातील अनेक जणांकडून टीकेची झोड उठवली जाते. त्यातच सध्या राज्यात थोर संत, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. त्यावरुन समाजासह राजकारणातही संतापाची लाट उसळताना पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सध्या एक वादग्रस्त ट्वीट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर भाजपने जोरदार टीका केली होती. त्यानंतर आव्हाडांनी एक खोचक ट्वीट केलं आहे. त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, ‘रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.’ त्यांच्या या ट्वीटनंतर शिंदे गटासह भाजपनं हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त ट्वीट (Jitendra Awhad’s Controversial Twit)

“रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्ण -अर्जुन समजावून सांगा. बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा”, असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी ‘आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा’ असा हॅशटॅग वापरला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी या आधी पुण्यात बोलताना एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आक्षेप घेत विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे ना. १६६९ साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर नागपूर, पुण्यात निदर्शने करण्यात आली. भाजपच्या काही नेत्यांनी आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे म्हणत टीका केली आहे.

‘आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलं’ (Naresh Mhaske Comment on Awhad’s Twit)

आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या ट्विटनंतर शिंदे गट (Shinde Group) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आव्हाडांच्या या ट्विटवर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले आहेत की, ”हा हिंदुत्वाला डिवचण्याचा प्रयत्न आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीला डिवचण्याचा हा प्रयत्न आहे. ते म्हणाले, आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. यामागचं कारण म्हणजे, त्यांचे कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील सर्व नगरसेवक त्यांना सोडून चालेल आहे. काही दिवसात हे दिसेल. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुल बिघडलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत.”

‘ठाकरेंचा आव्हाडांना पाठिंबा?’

”ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा मार्ग दिला. त्या हिंदुत्त्वाच्या विरोधात वागणाऱ्या लोकांना तुम्ही (उद्धव ठाकरे) आपल्या बाजूला बसवत आहात. मांडीला-मांडी लावून बसवत आहात, गळ्यात-गळे घालत आहात. त्यांच्यासोबत आघाडी करत आहेत. यात जी काय त्यांची भूमिका आहे, यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका आधी स्पष्ट करावी, त्यांचा आव्हाडांना (Jitendra Awhad) पाठिंबा आहे? का त्यांच्या विधानाला विरोध आहे? हे आता महाराष्ट्रात महत्वाचं आहे.”

‘आव्हाडांचा पुतळा जाळून वक्तव्याचा निषेध’ (Burned effigy of Jitendra Awhad and protested against their statement)

जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलना दरम्यान आव्हाड यांनी जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी केलीय. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवरायांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाद्वारे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा पुतळा जाळून निषेध केला. यावेळी या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आवाडांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांची जीभ छाटणाऱ्यास बक्षिसाची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या-