Jitendra Awhad Resign । मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) काल (2 मे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेत्यांनी पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा म्हणून विनंती देखील केली. तर आज पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad) यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी दिला पदाचा राजीनामा ( Jitendra Awad resigned from the post)
जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी कालपासून एकच मागणी केली होती की, शेवटपर्यंत शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत त्यांनी राजीनामा मागे घ्यावा. तसचं यासाठी शेवटपर्यत मी प्रयत्न करणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. याचप्रमाणे आव्हाडांसोबतच ठाण्यातील राष्ट्रीवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. यामुळे या विषयाला आता वेगळं वळण आलं असल्याच पाहायला मिळतं आहे.
दरम्यान, आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, आम्ही आमचे राजीनामे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे पाठवले आहेत. “शेवटपर्यंत शरद पवार हेच अध्यक्ष राहावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नवीन कोणी अध्यक्ष झाला असेल तर त्या संदर्भात मला माहिती नाही. एकदा शरद पवार पदावरून बाजूला झाले की, मग ते लक्ष देणार नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आहे.” तर काल मंगळवारी (2 मे) अजित पवार यांनी पक्षातील कोणाचाही राजीनामा स्वीकारणार नसल्याचं सांगितलं होतं, असं असतानाही जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल देसाई यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आता पुढे शरद पवार कोणती भूमिका घेणार? त्यांनी दिलेला राजीनामा माघारी घेणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षतेपदी चार लोकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल पटेल यांची नावं चर्चेत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Jayant Patil | बैठकीला मला बोलवण्याची गरज वाटली नसेल – जयंत पाटील
- Anil Patil | अनिल पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा
- Brahman Bhushan Puraskar: अभिनेते प्रशांत दामले यांना “ब्राह्मण भूषण” पुरस्कार जाहीर
- Nana Patole । “संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये” : नाना पटोले
- Indian Navy | भारतीय नौदलात ‘या’ पदांसाठी भरती सुरू