रजिस्टर लग्न करत जितेंद्र आव्हाडांच्या मुलीने सर्वांपुढेच ठेवला एक चांगला आदर्श

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनानंतर लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदली आहे. मात्र असं असताना एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेतेमंडळी त्यांच्या मुलामुलींची लग्न धुमधडाक्यात साजरी करताना आपण सर्वांनी पाहिली. पण एकीकडे हे सर्व सुरु असताना दुसरीकडे अत्यंत सध्या पद्धतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला आहे.

हे लग्न आता सर्वांच्या चर्चेचा विषय बनतंय. त्याच कारण असं कि, अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाड आणि एलन पटेल यांचा विवाहसोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला. बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्दतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

तसेच यावेळी जितेंद्र आव्हाड बोलताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले. २५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी असल्याचे सांगताना त्यांना अश्रू आवरत नव्हते. एका बापाने अशावेळी काय बोलायचे? असे सांगताना ते भावूक झाल्याचे पहायला मिळाले. कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार…घरातील घरपण गेल्यासारखे असेल, हे अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा