जितेंद्र-हेमा मालिनीचे लग्न तुटले ‘या’ व्यक्तीमुळे

चित्रपटसृष्टी एक असं क्षेत्रं आहे, जिथे मनोरंजनासोबत कलाकारांचे असंख्य किस्सेसुद्धा प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतात. प्रत्येक कलाकाराच्या खासगी आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेत्री यांच्या आयुष्यातील असाच एक किस्सा ‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

हा किस्सा आहे, हेमा मालिनी आणि जितेंद्र यांच्या लग्नाच्या वेळचा. दोघांमध्ये मैत्रीपुरतंच नातं सिमीत होतं. त्यानंतरच्या दिवसांमध्ये हेमा आणि जितेंद्र एकमेकांचे खूप चांगले मित्र ठरले. पण, धर्मेंद्र यांना मात्र त्यावेळी ही मैत्री अजिबात रुचली नव्हती. पण, नशिबात मात्र काही वेगळंच लिहून ठेवलं होतं.

हेमा, जितेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय त्यावेळी मद्रासला गेले. जिथे या दोघांचं लग्न होणार होतं. धर्मेंद्रसाठी तर हे सर्व अनपेक्षित होतं. ही बातमी धर्मेंद्र यांच्यापर्यंत पोहोचताच त्यावेळी त्यांनी जितेंद्र यांची तत्कालीन प्रेयसी शोभा सिप्पी यांच्या घरी धाव घेतली आणि त्यानंतर ते दोघंही मद्रासला रवाना झाले. धर्मेंद्र आणि शोभा दोघंही त्यांचं प्रेम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. हेमा यांनी ही चूक करु नये अशी विनंती धर्मेंद्र त्यांना करत होते. उपस्थित सर्वजण एकाच उत्तराची वाट पाहात होते. शेवटी हेमामालिनी यांनी नकारार्थी मान हलवली आणि जितेंद्रसोबतचं त्यांचं लग्न तुटलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.