जितेंद्र हे अमिताभ बच्चनपेक्षाही भारी!, रीना रॉय यांनी दिला जितेंद्र सोबतच्या आठवणींना उजाळा

मुंबई : छोट्या पडद्यावरील रिऍलिटी शो ‘इंडियन आयडल १२’मध्ये या आठवड्यात गेस्ट म्हणून अभिनेत्री रीना रॉय आणि बप्पी लहरी हजेरी लावणार आहेत. तसेच हे दोघे आपल्या गाण्याने इंडियन आयडलच्या स्टेजवर धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. हे मनोरंजन चालू असताना अनेक आठवणींना उजाळा देखील मिळणार आहे.

या आठवड्याच्या अखेरीस प्रसारित होणा-या या भागामध्ये दानिश खानने रीन रॉय यांच्यावर चित्रीत केलेले ‘आदमी मुसाफिर है, आता है ताजा है’ हे गाणे गायले. दानिशने गायलेल्या या गाण्यामुळे सगळेजण भारावून गेले होते. रीना रॉय यांना दानिशने गायलेले गाणे खूपच आवडले.

यावर त्या म्हणाल्या, ”दानिश तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने हे गाणे गायले आहेत. अशाच छान पद्धतीने तुम्ही गात रहा. तुमच्या गाण्यामुळे काही जुन्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत.”त्यानंतर रीना यांनी त्यांच्या काही आठवणी उपस्थितांना सांगितल्या. इतकेच नाही तर स्पर्धकांनी गायलेल्या गाण्यांवर रीना रॉय यांनी स्टेजवर मनसोक्त डान्स ही केला.

रीना रॉय या गाण्याच्या आठवणी सांगिताना म्हणाल्या, ”या गाण्याची चित्रीकरण काश्मीरमध्ये झाले होते. या चित्रीकरणासाठी आम्ही सर्वजण एक महिना तिथे वास्तव्यास होतो. त्यावेळी अनेक क्रू मेंबर्स त्यांच्या लहान मुलांना घेऊन आले होते. काम संपल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून खेळायचो. मी जितेंद्रजींसोबत अनेक सिनेमांत काम केले आहे. जितेंद्र हे वेळेच्या बाबत अतिशय सजग असायचे. दिलेल्या वेळेवर ते यायचेच. त्यांचे इतके वक्तशीर कुणीच नाही अगदी अमिताभ बच्चनही नाही.” असं म्हणत रीना यांनी आठवणींना उजाळा दिला.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा