Job Opportunity | एअर इंडिया ट्रान्सपोर्टमध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) गोवा, यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती (Interview) आयोजित करण्यात येणार आहे.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड, गोवा यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 386 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी/ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हॅंडीमॅन पदांच्या रिक्त जागा आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.aiasl.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या मुलाखतीसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांनी 12, 13, 15, 17 आणि 18 फेब्रुवारी 2023 रोजी स्वखर्चाने उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे – फ्लोरा ग्रँड, वड्डेम तलावाजवळ, रेडिओ मुंडियाल, वाड्डेम वास्को द गामा, गोवा, पिनकोड- ४०३८०२

महत्वाच्या बातम्या