Job Opportunity | कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंगमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे अनेक संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग (CME), पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग, पुणे यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 135 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये लेखापाल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वरिष्ठ मेकॅनिक, मशीन माइंडर लिथो, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी लिपिक, सँड मॉडेलर, कुक, फिटर जनरल मेकॅनिक, मोल्डर, सुतार, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट वुडवर्किंग, लोहार, पेंटर, इंजिन आर्टिफिशियर, स्टोअरमन टेक्निकल, प्रयोगशाळा अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ आणि लस्कर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशीलांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://pune.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)
CME यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://pune.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाइट
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1xRFEsX59MeGDmxhvB4aJpyzF_gGfwtKT/view
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! केंद्र शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
- Shabhuraj Desai | “संजय राऊत बोलायला लागले की, लोक चॅनेल बंद करतात”; शंभूराज देसाईंची राऊतांवर बोचरी टीका
- Nilesh Rane | “विनायक राऊत आणखी किती दिवस उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार?”
- Sandipan Bhumre | “त्याची उंची किती, तो बोलतो काय”; आदित्य ठाकरेंच्या टीकेवर संदिपान भुमरेंचा पलटवार
Comments are closed.