Job Opportunity | चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात जिल्हा परिषद (Zilla Parishad), चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे.
जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
शालेय पोषण आहार कक्ष, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, चंद्रपूर.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1JO_dxYTAOWoFXeD3uVCD41xWDylv3wvI/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | “बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर…”; पवारांनी सांगितलं भाजपच्या पराभवाचं कारण
- Weight Loss | वजन कमी करण्यासाठी नाश्त्याचे वेळी करा ‘या’ ज्यूसचे सेवन
- Uddhav Thackeray | “भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नाही”; उध्दव ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका
- Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ बँकेत नोकरीची संधी
- Deepak Kesarkar | “मग तुमची बारामतीची सीट जाईल असं म्हणू का?”; पवारांच्या वक्तव्यावर केसरकरांचा सवाल
Comments are closed.