Job Opportunity | दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी नोकरीची संधी! ‘या’ संस्थेत रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. यंत्र इंडिया लिमिटेड दहावी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज सुरू होणार आहे.
यंत्र इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) 5450 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये आयटीआय / Non- ITI 1887 जागा आणि आयटीआय / Ex- ITI 3508 जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी सामान्य श्रेणीतील इच्छुक उमेदवारांना अर्ज भरताना 200 रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 28 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही शहरात नोकरी करावी लागू शकते.
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/11o5yFDFQ_3lltsFnZoDMFrZf5Gf-E5Gs/view
अधिकृत वेबसाईट
https://www.yantraindia.co.in/home.php
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! राज्य शासनाच्या ‘या’ विभागात भरती प्रक्रिया सुरू
- Glowing Skin | त्वचेला चमकदार बनवण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Devendra Fadnavis | “मी सनसनाटी करण्यासाठी कधीही वक्तव्य करत नाही”; राऊतांच्या वक्तव्यावरुन फडणवीसांचा पलटवार
- Sanjay Raut | “फडणवीसांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय”; संजय राऊतांची बोचरी टीका
- Sanjay Raut | “हिंमत खोक्यातून येत नसते, एकनाथ शिंदे हिंमत कुठून आणणार?”
Comments are closed.