Job Opportunity | नोकरीची संधी! बीडमध्ये ‘या’ संस्थेत रिक्त पदांच्या जागा करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) स्टाफ नर्स पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, पगार, वय आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता (Address to submit application)

जिल्हा कार्य व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.

अधिकृत वेबसाईट

https://beed.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1ylziuSGBhN-rkjRTDFJN2w-Q65ETJlqr/view

महत्वाच्या बातम्या