Job Opportunity | नोकरीची सुवर्णसंधी! MITCL मध्ये ‘या’ पदांच्या 20 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITCL) पात्रताधारक इच्छुक उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

MITCL यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, अकाउंट ऑफिसर, कॉस्ट अकाउंटंट, लीगल असिस्टंट, सीनियर नेटवर्क इंजिनीअर, नेटवर्क इंजिनिअर, O & M इंजिनिअर, IT ऑफिस असिस्टंट, नेटवर्क मॅनेजर, IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर, O & M मॅनेजर आणि RFMS स्पेशलिस्ट (GIS एक्सपर्ट) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक उमेदवारांना पुढील ई मेल पत्त्यावर हा अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्जासाठी ई-मेल पत्ता (E-mail address for application)

hr1.mahait@mahait.org

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://mahait.org/

जाहिरात पाहा (View ad)

https://mahait.org/Site/CurrentOpening

महत्वाच्या बातम्या