Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू शकतात.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 541 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक, कोर्ट लिपिक, प्राणी रक्षक, समाजसेवक, लिपिक आणि इतर पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) दिनांक 10 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील ई-मेल पत्ता अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.pcmcindia.gov.in/marathi/
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, पाहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
- Job Opportunity | राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- IPL 2023 | आयपीएलमध्ये अजून एकही विकेट घेतली नाही, तरीही ‘या’ खेळाडूला मिळाले टीम इंडियात स्थान
- Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? राऊत बोलण्यालायक नाही – देवेंद्र फडणवीस
- IPL 2023 | विराट कोहलीला मागे टाकत धोनीने रचला ‘हा’ विक्रम