Job Opportunity | बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया (Bank of India) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 500 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आजपासूनच अर्ज करू शकतात.

बँक ऑफ इंडियाच्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 500 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. त्यामध्ये क्रेडिट ऑफिसर पदाच्या 350 जागा आहे. तर, स्पेशालिस्टमध्ये आयटी ऑफिसर पदाच्या 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवाराला 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरती प्रक्रियेतील क्रेडिट ऑफिसर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही प्रवाहात पदवीधर असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://bankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती मोहिमेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 29 वर्षाच्या दरम्यान असावे. या भरती प्रक्रियेमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमान वयोमर्यादित सवलत दिली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फी भरावी लागणार आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये फी भरावी लागणार आहे. तर SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांना 175 रुपये फी स्वरूपात भरावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://bankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या