Job Opportunity | टीम कृषीनामा: भारत सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी (Employment Opportunity) उपलब्ध करून देत असते. अशात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दुरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे.
दूरसंचार विभागाच्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये सहायक निदेशक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांचा समावेश आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://dot.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://dot.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अर्ज पाठवण्याचा पत्ता (Address to send application)
कार्यालय, महाराष्ट्र एलएसए सल्लागार, दूरसंचार विभाग, सीटीओ कंपाऊंड, चर्च रोड, कॅम्प, पुणे, पिनकोड- 411001
अधिकृत वेबसाइट
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1-m-BOpnnzapAIzvHA0XK6wH9H6mGqaKC/view
महत्वाच्या बातम्या