Job Opportunity | महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (Employees’ State Insurance Scheme), मुंबई यांच्या अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ- 09 जागा आणि वैद्यकीय अधिकारी – 09 जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 2 मे 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे अपेक्षित आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
प्रशासकीय ब्लॉक, 4था मजला, MH-ESIS हॉस्पिटल, आकुर्ली रोड, ठाकूर हाऊस जवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1Q4r6D07LOQW1E1Smwi73M9dujY33Bbfe/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.maharashtra.gov.in/1125/Home
महत्वाच्या बातम्या
- Arvind Kejriwal | भाजपचा अरविंद केजरीवालांवर गंभीर आरोप ; तर केजरीवालांनी बंगल्याच्या नूतनीकरणावर केले इतके कोटी रुपये खर्च!
- Whatapp | 4 मोबाईलमध्ये एकाच वेळी वापरता येणार व्हॉट्सॲप; मार्कच्या ‘त्या’ पोस्टवर वापरकर्त्यांच्या मजेशीर कमेंट्सचा वर्षाव
- Amit Shah | …म्हणून एकनाथ शिंदे घेणार अमित शहांची भेट!
- Mallikarjun Kharge | “काँग्रेसने 70 वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं” : मल्लिकार्जुन खरगे
- Bank Job | ‘या’ बँकेमार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.