Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: उच्च न्यायालय (Bombay High Court), मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) सेवानिवृत्त जिल्हाअतिरिक्त सत्र न्यायाधीश पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या पदांसाठी (Job Opportunity) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 29 एप्रिल 2022 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई, पिनकोड- ४००००१

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1xZmETTxc2MHgmeuwLJMZ2veuAslS0CNw/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://bombayhighcourt.nic.in/index.php

महत्वाच्या बातम्या