Job Opportunity | राज्य शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम कृषीनामा: राज्य शासनामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासन युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Maharashtra State Electricity Distribution Company) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या 87 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

राज्य शासनाच्या या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) पात्रताधारक उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशीलांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://www.mahatransco.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती मोहिमेसाठी (Job Opportunity) पात्रताधारक उमेदवार 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरून या अर्जाची प्रत सादर करावी लागणार आहे. उमेदवारांना दिनांक 1 मार्च 2023 पर्यंत अर्जाची प्रत सादर करणे अनिवार्य आहे.

अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता (Address to submit copy of application)

अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई, पिनकोड- 400798.

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली. ता. पालघर, जि. पालघर, पिनकोड- 401501.

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://www.mahatransco.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1N_i5VzkjiTja2hwQsrLV1ThixDT-qnsE/view

महत्वाच्या बातम्या

Weather Update | ‘या’ तारखेपासून राज्यातील थंडी गायब होणार, पाहा हवामान अंदाज

Diabetes | डायबिटीसच्या रुग्णांनी नाश्त्यात करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, मिळतील अनोखे फायदे

Indian Navy Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! भारतीय नौदलात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

CBSE Admit Card | इयत्ता दहावी आणि बारावी CBSE अॅडमिट कार्ड जारी

Skin Care Routine | त्वचा सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टी

You might also like

Comments are closed.