Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आरोग्य विभाग (Department of Health) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
आरोग्य विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती मोहिमेमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)
या रिक्त पदांसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक/ धुळे/ नंदुरबार/ जळगाव/ अहमदनगर
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1ppou6IVzIgzuGo6vGy-TU3GRnfl6nnsK/view
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात आजपासून पुन्हा होणार थंडीत वाढ, हवामान विभागाचा इशारा
- Sanjay Shirsat | “शिवसेनेचा पक्ष निधी ठाकरेंनी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला”; शिरसाटांचा गंभीर आरोप
- Bhaskar Jadhav | “त्यांना भस्म्या रोग झालाय, आता अजेंडा सुद्धा चोरायचाय”; भास्कर जाधवांची शिंदे गटावर बोचरी टीका
- Kapil Sibal | “वकिली करायची असेल, तर वकिली करा, पण…”, कपिल सिब्बलांचा शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला
- Sharad Pawar | “हे निर्णय कोण घेतंय याबाबत आम्हाला शंका”; निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य