Job Opportunity | 12 वी उत्तीर्ण असलेल्यांसाठी नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (SBI General Insurance Company Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये व्यवसाय प्रतिनिधी/सूत्रधार पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6401ccab977ed15ea4781e2a

अधिकृत वेबसाइट (Official website)

http://www.sbigeneral.in/

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.