Job Opportunity | MPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एमपीएससी (MPSC) च्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. यासाठी एमपीएससीमार्फत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

एमपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 21 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहायक आणि लिपिक-टंकलेखक (इंग्रजी/ मराठी) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

राज्य सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पासून दिनांक 20 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://mpsc.gov.in/

ऑनलाइन अर्ज करा

https://mpsconline.gov.in/candidate

महत्वाच्या बातम्या