Job Opportunity | ST महामंडळामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासन विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या नागपूर विभागातील आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मेकॅनिक (मोटर वाहन), मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (जनरल) आणि मेकॅनिक डिझेल पदाच्या रिक्त जागा आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क (Contact for more information)

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील अर्ज करण्याच्या अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://msrtc.maharashtra.gov.in/

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.