Job Vacancies | दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरीची संधी! भारत सरकारच्या ‘या’ विभागात भरती प्रक्रिया सुरू

Job Vacancies : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकार दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. भारतीय पोस्ट विभागात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

भारतीय पोस्ट विभागाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) तब्बल 2508 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदांमध्ये शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाक सेवक ही रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Job Vacancies 10th Class Passed  भारत सरकार भरती 

भारत सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी (Job Vacancies) इच्छुक उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी (Job Vacancies) अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या