संरक्षण मंत्रालयात चार्ज मनच्या 1700 पदांसाठी भर्ती

भारत सरकार अंतर्गत संरक्षण मंत्रालयात विविध रिक्त पदांच्या भर्तीसाठी अर्ज मागवण्यात आल्या आहेत. इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीमधील चार्ज मन पदाच्या एकूण 1 हजार 704 रिक्त पदांसाठी हे अर्ज मागवण्यात अल्या आहेत. ओपनसाठी 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तर आरक्षण वर्गाला वयोगटाच्या मर्यादेत सुट देण्यात आली आहे. या पदावर अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 9 जून 2019 आहे. त्यापूर्वी इच्छुकांनी या पदासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे.
इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीमधील चार्ज मन पदाच्या एकूण 1 हजार 704 रिक्त पदावर भर्ती होणा-यांना 9 हजार 300 ते 34 हजार 800 पर्यंत वेतन दिले जाणार आहे. विद्यापीठ अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांमधून इंजिनिअरिंगची पदवी अथवा डिप्लोमा, बी टेकमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा, यासोबतच एम टेक/ पदव्युत्तर शिक्षण धारक या पदासाठी अप्लाय करु शकता.
उमेदवारांची लिखिती परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना 200 गुण असणार आहे. त्यानंतर ट्रेड चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवरांसाठी 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तर ओबीसीसाठी तीन वर्ष आणि एससी/एसटींसाठी वर्योमर्यादेत पाच वर्षाची सुट दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- राहुलच्या वागण्याने काँग्रेसची अधोगती; राहुल गांधीनी वापरलेल्या Modilie शब्दावरुन भाजपचा टोला
- बंगालमधील ‘त्या’ हिंसाचारानंतर प्रचार एक दिवस आधीच बंद; निवडणूक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय
- पश्चिम बंगालमधील मुसलमान ‘वंदे मातरम्’चे नारे देणार आहेत काय? – सामना
- शरद पवारांनी घेतली दुष्काळ प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट